ते आमचे जवळचे मित्र, सहकारी…आम्ही तिथेच आहोत… एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले..
एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांसोबत झालेल्या भेटीवरूनही राऊत स्पष्टच बोलले, आम्ही ठरवून भेटलो नव्हतो, आमची भेट अनपेक्षित होती. शिंदे जरी बेकायदेशीर असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
निवडणुकीच्या प्रचाराचे राज्यभर वारे वाहत आहेत. अशातच अंबरनाथमधील काँग्रेस आणि भाजपच्या युतीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टच बोलले. अंबरनाथमध्ये झालेल्या धक्कादायक युतीवरून राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि भाजपच्या युतीचा प्रकार हा चव्हाणांच्याच भागात घडलेला असून यामागे रवींद्र चव्हाण यांचं कारस्थान आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला प्रचंड तिटकारा होता, पण आता काँग्रेसला पण बरोबर घेतलयं आणि MIM च्या लोकांना पण मांडीवर घेऊन बसतात, असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांसोबत झालेल्या भेटीवरूनही राऊत स्पष्टच बोलले, आम्ही ठरवून भेटलो नव्हतो, आमची भेट अनपेक्षित होती. शिंदे जरी बेकायदेशीर असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती जर त्या कार्यक्रमात अली आहे तर त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यात नाही असं देखील राऊत म्हणाले. आमच्यात हाय हॅलो झालं आणि आम्ही निघून गेलो, कारण एकेकाळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्र होते. आम्ही आहोत तिथेच आहोत त्यांनी पलायन केलं. पळून जाणारे, नीतिवान आणि निष्ठावान असतात त्यांच्या नजरेला नजर भिडवत नाही असं म्हणत चांगलाच टोला राऊतांनी लगावला आहे.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला

