Uday Samant : हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही – मंत्री उदय सामंत
Uday Samant On Hindi Language Compulsion : राज्यात नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा ही सक्तीची केल्याने भाषेच राजकारण पेटलं आहे. त्यावर आज मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विद्यार्थ्यांनी हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. तिसरी कोणतीही भाषा विद्यार्थी निवडू शकतात. काही जणांकडून गैरसमज निर्माण केला जात आहे, असा आरोप देखील माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सामंत यांनी केला आहे. पहिली ते पाचवी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावर सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, हिंदी विषयाचे शिक्षक प्रत्येक शाळेत आहेत. मात्र हिंदी हाच विषय घेतला पाहिजे अशी काही सक्ती नाही. तिसरी कोणतीही भाषा आपण निवडू शकतो. जर तशी मागणी करणारे 20 विद्यार्थी असतील तर त्यांना तिथे शिक्षक देखील पुरवला जाईल. जर त्या पेक्षा कमी मुलं असतील तर त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिलं जाईल, अशी आमची भूमिका आहे. काही मंडळी यातून जो गैरसमज निर्माण करत आहेत, तो करू नये, असं उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

