Mahayuti Tension : हिंगोलीत भाजपला शिंदे सेनेचा धक्का, उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश, महायुतीत घडतंय काय?
स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत फोडाफोडीचे राजकारण तीव्र झाले आहे. हिंगोलीत भाजपच्या नगरसेवक पदाचे उमेदवार भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घेत थेट शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. या घटनेमुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे, ज्यामुळे शिंदे-भाजपमधील तणाव वाढला आहे.
स्थानिक निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरूच आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा हिंगोलीमध्ये आला आहे. हिंगोली येथील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार भास्कर बांगर यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी मागे घेताच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे हिंगोलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या घटनेनंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजपचाच उमेदवार पळवल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशावर आक्षेप घेत, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. फोडाफोडीचे हे राजकारण दिल्लीपर्यंत पोहोचत असतानाही, महायुतीतील घटक पक्षांमध्येच हा प्रकार सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

