Shirdi | शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारपदी भाग्यश्री बानाईत यांची नियुक्ती

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानाईत-धिवरे (Bhagyashree Banayat) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बानाईत याआधी रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. कान्हूराज बगाटे यांची 10 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली होती. त्यांना सरकारने पदोन्नतीतून आएएस पद दिलं. ते थेट आयएएस अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल करत बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या याचिकेत पोलीस प्रशासनाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. कान्हूराज बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानाईत यांची नेमणूक करण्यात आली आहे, बगाटे मात्र अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI