गृहमंत्री महोदय जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठंय तुमचं…; रोहित पवार आक्रमक, थेट केला सवाल
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील पण...
पुण्यातील अपघात प्रकरणामुळे राज्यात एकच चर्चा सुरू आहे. तर या प्रकरणाची चौकशी सुरू असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? असा सवाल त्यांनी केला आहे. तर आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या! असेही म्हटले आहे.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

