Vikram Misri : टेररीस्ट अॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री
Operation Sindoor Press Conference : परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आज पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्याची माहिती देण्यात आली.
पाकिस्तान अनेक वर्षापासून दहशतवादी कारवाया करत आहेत. एलओसीवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी करण्यात येत आहे. भारताने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानचा हा दावा चुकीचा आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला केला आहे. दुर्देवाने पाकिस्तान टेररीस्ट अॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा सहारा घेत आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना हे म्हंटलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, ७ तारखेच्या स्ट्राईकमध्ये नागरिक मारल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जातं. पण आम्ही टार्गेट ठेवून हल्ला केला होता. काल अतिरेक्यांचं दफनविधी होती. त्यात कोणताही सिव्हिलियन मारला गेला नसल्याचं स्पष्ट होतं. माझ्या हातात चित्र आहे. त्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. पाकिस्तानी ध्वज आहेत. मेलेल्या अतिरेक्याला स्टेट हॉनर दिलं जातंय याचं मला आश्चर्य वाटतं. पाकिस्तानचा एक दावा आहे. आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी. संयुक्त तपास व्हावा. पहलगाम हल्ल्याचा. तुम्हाला याचा इतिहास माहीत आहे. ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे. पाकिस्तान कसा वागतो ते माहीत आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे १६ नागरिक ठार झाले आहेत. ४६ जखमी झाले आहेत. त्यात लहान मुलं आहे. पाकिस्तान या हल्ल्याला कम्युनल अँगल दिला जात आहे, असंही यावेळी मिस्री यांनी म्हंटलं आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

