Pakistan : भारताच्या हल्ल्याची काय गरज? पाकचाच आपल्या नागरिकांवर ड्रोन हल्ला, काही लोकं मेले… ख्वाजा आसिफला प्रश्न करताच पळाला
पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून मोठमोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन महिन्यात तीन वाँटेड दहशतवाद्यांना पाकिस्तानात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तर दोन वर्षात हा आकडा सोळावर गेल्याची माहिती मिळतेय
पाकिस्तानने आपल्याच देशातील नागरिकांवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील उत्तर वाझिरिस्तानमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराविरोधात पाकिस्तानी नागरिक रस्त्यावर उतरली असून सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. पाकिस्तानच्या सैन्यानी केलेल्या कृत्यामुळे त्याच्याच देशात संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला. पाकिस्तानने १० किलोमीटरसाठी हल्ला केलेले ड्रोन हे तीन किलोमीटरमध्येच पडतात, असं म्हणत पाकिस्तानमधील संसदेत विरोधकांनी सरकारवरच हल्लाबोल केलाय. दरमयान, पाकिस्ताने आपल्याच नागरिकांवर ड्रोन हल्ला केलाय. यात चार जणांचा मृत्यू झालाय. यासंदर्भात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफला सवाल केला असता त्याने पळ काढल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

