Indus Waters Treaty : पाकिस्तान पाण्यासाठी तरसणारच… पत्र पाठवल्यानंतर पाकची ‘ती’ विनंती भारतानं धुडकवली
भारताने पाणी अडवल्याने पाकिस्तानात जलसंकट निर्माण झालं आहे. त्यामुळे भारताने सिंधू जल करारासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी विनवणी पाकिस्तानकडून भारताला कऱण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात काही कठोर निर्णय घेतले. यामध्ये सिंधू जल करार स्थगित करत भारताकडून पाकिस्तानचं मोठं नुकसान करण्यात आलंय. सिंधू नदीचं पाणी अडवताच पाकिस्तान गुडघ्यावर आल्याचे पाहायला मिळतंय. पाकिस्तानने भारताला एक पत्र लिहिलं असून सिंधू जल कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती तहानलेल्या पाकिस्तान भारताकडे केली आहे. मात्र पाकिस्तानने केलेली ही विनंती भारताने धुडकावून लावली असल्याची माहिती समोर येत आहे. सिंधू जल करारावरून पाकिस्तानला आता चांगलीच धडकी भरली आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी अडवल्याने जलसंकट निर्माण होण्याची पाकला भिती सतावतेय. यावरूनच घाबरलेल्या पाकिस्तानने भारताला एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पाकिस्तानने सिंधू जल करारचा पुनर्विचार करा, अशी विनवणी केली आहे. पहलगाम हल्ला पाकिस्तानने घडवून आणल्यानंतर भारताने पाकिस्तानसाठी सिंधू जल करार स्थगित केला आहे. सिंधू नदीवर पाकिस्तानचं जवळपास ८० टक्के कृषी क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे पाककडून भारताकडे गयावया केल्या जात आहे.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

