Yoga Day 2025 : 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस, पुण्यात मुख्यमंत्र्यांनी केला लाखो वारकऱ्यांसह योगाभ्यास
'आज सगळ्यांनी हा भक्तियोग नीट देखील केला. मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आंतराष्ट्रीय योगा दिन 21 जूनला साजरा करण्याची मागणी केली व सगळ्या देशांनी ती मान्य देखील केली', असे मुख्यमंत्री या वारकरी भक्तियोग उपक्रमांतर्गत योगा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगासने केल्याचे पाहायला मिळाले. हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी साडे सात वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल हा कार्यक्रम झाला. ‘राजयोगाच्या मागे पळणाऱ्यांना आज भक्तीयोगा शिकवला. त्याबाबद्दल धन्यवाद..’, असे फडणवीस म्हणाले.
वारकरी भक्तियोग उपक्रमांतर्गत फडणवीसांनी योगा केल्यानंतर ते म्हणाले, योगाची सगळी आसन शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या रचनेनुसार रचले आहेत म्हणून आरोग्य उत्तम राहतं. वन अर्थ वन हेल्थ असा संदेश मोदींनी दिलाय. हा संदेश आपल्या कृतीतून पाळणारे आमचा वारकरी संप्रदाय आहे. यांच्यासमवेत योगा करणे हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे.

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
