Jalgaon | जळगाव महापालिकेत खळबळ, भाजपच्या 29 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा

जळगाव महापालिकेत काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 29 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली.

जळगाव महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या 29 नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आणि नवीन पदाधिकारी नियुक्त केले. जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या निम्म्या नगरसेवकांचा गट फुटून शिवसेनेत गेला होता.

जळगाव महापालिकेत काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 29 नगरसेवकांनी फुटून शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली. यानंतर कालच्या दिवशी नाट्यमय कलाटणी मिळाली. फुटीर भाजप नगरसेवकांनी स्वतंत्र बैठक घेऊन महापालिकेत नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत. याबाबत या गटाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी महापौरांना लेखी पत्र देऊन नवीन पदाधिकारी नियुक्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

Published On - 8:57 am, Wed, 7 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI