Sanjay Raut : …अन्यथा सीमाप्रश्नावरून रक्तपात होईल, राऊत यांचं अमित शाह यांना आवाहन

सोनेश्वर भगवान पाटील, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 1:08 PM

प्रक्षोभक भाषणाप्रकरणी बेळगाव कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे.

मुंबई : बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट आहे. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे. प्रक्षोभक भाषणाप्रकरणी बेळगाव कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे. 1 डिसेंबरला त्यांना बेळगाव कोर्टात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संजय राऊत यांचं अमित शाह यांना आवाहन?

सीमाप्रश्नात गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लक्ष घालावं, अन्यथा रक्तपाताची भीती, ही जबाबदारी केंद्राची आहे. राजकारण करू नका. तर सीमाप्रश्नावर गुवाहाटीत नवस करणार आहात का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारला लागवला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI