कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं… अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर

कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं… अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर

| Updated on: Aug 23, 2026 | 11:34 AM

छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. आयफोनच्या हप्त्यांमुळे नव्हे, तर आई-वडिलांमधील वाद मिटवण्यासाठी कुणाल त्यांना भीती दाखवण्यासाठी गेला होता. यावेळी अपघाताने तोल जाऊन ही घटना घडल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले, आयफोनच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

छत्रपती संभाजीनगर जवळील खवड्या डोंगरावर घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. कुणाल चांदगुडे नावाचा युवक आई-वडिलांमधील वाद मिटवण्यासाठी त्यांना भीती दाखवण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेला होता. मात्र, याच प्रयत्नात तोल जाऊन कुणाल आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई-वडिलांचाही दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर कुणालने आयफोनच्या हप्त्यांसाठी आत्महत्या केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.

मात्र, कुणालच्या नातेवाईकांनी या चर्चांचे खंडन केले आहे. नातेवाईकांच्या मते, कुणालच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती. त्याच्याकडे दोन आयफोन होते आणि तो नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होता. आई-वडिलांमधील किरकोळ वाद त्याला त्रास देत होते आणि तो त्यांना समजून सांगण्यासाठी गेला होता. यावेळी झालेल्या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. नातेवाईकांनी आई-वडिलांना आपल्या मुलांवर अशा प्रसंग येऊ न देण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Aug 23, 2026 11:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us