अनिल परब यांच्या चॅलेंजनंतरही किरीट सोमय्या भूमिकेवर ठाम, पण…

गिरीश गायकवाड

| Edited By: |

Updated on: Jan 31, 2023 | 1:01 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. त्यांनी इथं यावं. आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आमच्या स्टाईलने आम्ही त्यांचं स्वागत करू, असं अनिल परब म्हणालेत. त्यानंतरही सोमय्या अनिल परब यांचं कार्यालय असणाऱ्या ठिकाणी जाण्यावर ठाम आहेत.  पण पोलिसांनी त्यांना अडवलं आहे. त्यांनी काहीवेळाआधी कार्यालय परिसरात जाण्याची परवानगी देण्याची विनंती केली. याबाबत त्यांनी पोलिसांशी बातचित केली. पण पोलिसांनी त्यांना अडवलं आहे. आता सोमय्या पुढे कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI