बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावानेच नको ते केलं, नामांकित शहरातील घटना…

बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावानेच नको ते केलं, नामांकित शहरातील घटना…

| Updated on: May 07, 2026 | 11:41 AM

राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रोज एखादी हादरवणारी घटना घडत आहे, महाराष्ट्रातील हे गुन्ह्याचं चित्र अत्यंत भयंकर आहे. नुकतीच कोल्हापुरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रोज एखादी हादरवणारी घटना घडत आहे, महाराष्ट्रातील हे गुन्ह्याचं चित्र अत्यंत भयंकर आहे. नुकतीच कोल्हापुरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीसोबत जन्मदात्या पित्यानेच नको नको ते केले.

पीडित मुलीला गेल्या पाच वर्षांपासून तिच्याच कुटुंबातील व्यक्तींनी अत्याचार केल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात मुलीच्या जन्मदात्या वडिलांसह तिच्या मामाचा आणि अल्पवयीन मामेभावाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. घरातील व्यक्तींकडून वारंवार होत असलेल्या छळामुळे मुलगी मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर सहनशक्ती संपल्यानंतर तिने आपल्या आईसमोर संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळी असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आणि काही तासांतच दोन आरोपींना अटकही केली. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

Published on: May 07, 2026 11:41 AM
Follow Us