Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहिन्याला 1500 रूपये दिली जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहिन्याला 1500 रूपये दिली जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले, असे सांगितले जाते.
मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी सरकारने लागू केल्या होत्या. मात्र, अपात्र असलेल्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला. सरकारने केवायसी करण्याचे आदेश काढले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आला. अपात्र असलेल्या 6 हजार 457 लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली नुकताच करण्यात आली
