लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांची घोषणा करण्यात आलेली नसल्याने लाडक्या बहिणी काहीशा नाराज झालेल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्याच्या आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांची घोषणा झालेली नाही. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. मी शब्दाचा पक्का आहे, बहिणींना नाराज करणार नाही, अशी ग्वाही सुद्धा फडणवीस यांनी दिली आहे. सध्या त्रि लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहेत. जेव्हा 2100 देण्याचा निर्णय होईल तेव्हा आम्ही घोषित करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट बघवी लागणार आहे. दुसरीकडे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित येईल असं सांगितलेलं असताना बहिणींना केवळ फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे होळीच्या सणापूर्वी मार्चचा हप्ता मिळेल का? असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना पडला आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
