हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; पालघरमध्ये मैथिली ठाकूर यांची स्पष्ट भूमिका
आपल्या राज्याच्या विकासाठी मत द्या, इतर कोणत्या गोष्टींना बळी पडू नका, असं आवाहनही मैथिली ठाकूर यांनी जनतेला केलंय. मराठी की हिंदी या प्रश्नावर मैथिली ठाकूर यांनी चांगलंच उत्तर दिलंय, मी मराठी आहे, मी मराठी शिकते, मी पण उत्तर भारतीय मराठी आहे.
पालघरमध्ये भाजपच्या प्रचारासाठी बिहारच्या अलीनगर मतदारसंघाच्या भाजप आमदार मैथिली ठाकूर यांनी हजेरी लावली होती. या प्रचारादरम्यासाठी मला बिहारवरून इथे महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलावलं आहे, असं वक्तव्य मैथिली यांनी केलंय. आपल्या राज्याच्या विकासाठी मत द्या, इतर कोणत्या गोष्टींना बळी पडू नका, असं आवाहनही मैथिली ठाकूर यांनी जनतेला केलंय. मराठी की हिंदी या प्रश्नावर मैथिली ठाकूर यांनी चांगलंच उत्तर दिलंय, मी मराठी आहे, मी मराठी शिकते, मी पण उत्तर भारतीय मराठी आहे, कारण जेव्हा मी बिहारमध्ये इलेक्शनला उभी असताना मला महाराष्ट्रातल्या जनतेने देखील सपोर्ट केला होता. त्यामुळे महाराष्ट्र काय आणि बिहार काय दोन्ही माझ्यासाठी सारखेच आहेत, असं वक्तव्य तिने केलंय. हिंदी मराठी वादावर मैथिली स्पष्टच बोलली, ‘हा वाद पुढे आणून जनतेला वेगळ्याच गोष्टीकडे वळवलं जातंय, हिंदी मराठी वाद हा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा नसू शकतो, आपण वेगळ्या वेगळ्या भाषा बोलत असलो तरी आपल्या सगळ्यांचं लक्ष्य फक्त एकच असलं पाहिजे ते म्हणजे राष्ट्रसेवा’ असं वक्तव्य करत मतदान नक्की कशासाठी करावं याचा पाढाच मैथिली ठाकूर यांनी जनतेसमोर वाचला आहे.
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी

