AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur | नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन! व्हिडीओ होतेय व्हायरल

Latur | नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन! व्हिडीओ होतेय व्हायरल

| Updated on: Jun 09, 2026 | 3:54 PM
Share

लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेला जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण दिलासा देत न्याय मिळवून दिल्याची घटना समोर आली आहे. नातवंडांकडून अपेक्षित सांभाळ आणि जबाबदारी पार पाडली जात नसल्याने संबंधित वृद्ध महिलेने आपल्या नावावरील जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.

लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेला जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण दिलासा देत न्याय मिळवून दिल्याची घटना समोर आली आहे. नातवंडांकडून अपेक्षित सांभाळ आणि जबाबदारी पार पाडली जात नसल्याने संबंधित वृद्ध महिलेने आपल्या नावावरील जमीन आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी आपल्या नातवंडांच्या नावावर जमीन आणि मालमत्ता हस्तांतरित केली होती. मात्र, मालमत्ता हस्तांतरित केल्यानंतर त्यांचा योग्य सांभाळ केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी संबंधित जमीन आणि मालमत्ता पुन्हा आपल्या नावावर मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती.

या प्रकरणाची सुनावणी आणि पडताळणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने वृद्ध महिलेच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार, हौसाबाई लहाडे यांनी नातवंडांच्या नावावर केलेली जमीन आणि मालमत्ता पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वृद्ध महिलेला मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे कौतुकही केले जात आहे.

Published on: Jun 09, 2026 03:54 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या