MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 8 September 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 8 September 2021

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 7:58 AM

पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या खुनाचा कट उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भावाचा विजय सोपा व्हावा, यासाठी आरोपीने हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

पुण्यातील भाजप नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे (वय 46 वर्ष, रा. स्नेहनगर, वृंदावन) यांची हत्या करण्याचा कट उघड झाला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे आणि महेश आगलावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी धीरज घाटे यांनीच फिर्याद दिली होती. विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर याला आगामी पुणे महापालिका निवडणुकीत सहज निवडून येता यावे, यासाठी घाटे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.