Assembly Budget Session : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अधिवेशनात गदारोळ, विरोधक आक्रमक
NCP Jayant Patil in Assembly Session News : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सरकारकडून सभागृहात देण्यात आलेली नसल्याने आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गदारोळ घातला.
राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला आहे. मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सभागृहात का देण्यात आली नाही असा प्रश्न विरोधकांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. जयंत पाटील म्हणाले की, मुंडे यांनी राजीनामा दिला अशी माहिती बाहेर देण्यात आली मात्र याची माहिती अद्याप सभागृहात देण्यात आलेली नाही. आजपर्यंतच्या इतिहासात अशा घटनांची माहिती पाहिले सभागृहात सांगितली जाते, त्यांनंतर बाहेर मीडियामध्ये सांगितली जाते. त्यांनी राजीनामा दिला आहे आणि आम्ही त्यांना पदमुक्त केलं आहे, अशी माहिती इथे द्यावी लागते. मात्र अशी माहिती न दिल्यामुळे सरकार सभागृहाचा अवमान करत आहे. नवीन पायंडे सरकार या सभागृहात पाडत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
