Devendra Fadnavis | बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
राज्यातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोटनिवडणुकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
राज्यातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोटनिवडणुकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत.” बारामती विधानसभेची जागा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे, तर राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या जागांवरील पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
