Maharashtra HSC 12th Result 2026 | इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्के घसरला आकडा?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीचा एकूण निकाल काही टक्क्यांनी घसरला आहे.
महाराष्ट्र बोर्डाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बारावीच्या निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहि ती देण्यात आली. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
Published on: May 02, 2026 12:32 PM
मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला; अंधारेंचा स्फोटक दावा
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नाही; नेमकं घडतंय काय?
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी

