Devendra Fadnavis : वाढदिवस मुख्यमंत्र्यांचा…पवार अन् ठाकरेंकडून कौतुक पण शिंदेंच्या ट्वीटची का होतेय चर्चा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांचाही काल वाढदिवस झाला आणि वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांसह शरद पवारांनीही फडणवीसांचं भरभरून कौतुक केलं तर एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटची ही सर्वात जास्त चर्चा आहे.
वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना भरभरून कौतुक केलं. पवारांना तर फडणवीस थकत कसे नाहीत असा प्रश्न पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीस यांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमनाने ती वृद्धिंगत होत राहा असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो. क्रियाशील राहण्याकरिता प्रकृती शिडशिडीत असावी असे स्थूलमनाने म्हटलं जातं पण आम्हा दोघांमधील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो. शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केंद्रात जबाबदारी मिळेल असे संकेत दिले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ट्वीट चर्चेत राहिले. शिंदेनी फडणवीसांना शुभेच्छा देताना म्हटलंय विश्वासाचा हात असू दे मैत्रीचा सहवास असू दे… बघा नेमक्या काय दिल्या शुभेच्छा?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

