Nashik Election Drama : चौकात ये, कसा जिंकतो बघतेच… नाशकात तुफान राडा, उमेदवारीवरून भाजपचे नेते आमने-सामने
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नाशिक आणि नागपूरमध्ये राजकीय राडा पाहायला मिळाला. नाशकात भाजपने तिकीट नाकारलेल्या वंदना बिरा-री यांनी अधिकृत उमेदवाराला खुले आव्हान दिले, तर नागपुरात कार्यकर्त्यांनी उमेदवाराला घरात कोंडले. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयांवरून नाराजी आणि संघर्ष या घटनांमधून समोर आला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिक आणि नागपूरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. नाशकात भाजपच्या माजी नगरसेविका वंदना बिरा-री यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळकृष्ण शिरसाट यांना निवडून येण्याचे खुले आव्हान दिले. त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर देवानंद बिरारी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता, जो नंतर त्यांनी मागे घेतला. याचवेळी बाळकृष्ण शिरसाट यांच्याशी झालेल्या वादानंतर वंदना बिरारी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून आपलेच उमेदवार किसन गावंडे यांना घराला कुलूप लावून कोंडून ठेवले. आमदार परिणय फुके यांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच हा तिढा सुटला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. नाशिकमध्येही ज्ञानेश्वर काकड यांच्या समर्थकांनी त्यांना अर्ज मागे घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
चौकात ये, कसा जिंकतो बघतेच..नाशकात उमेदवारीवरून भाजपचे नेते आमने-सामने
निकालाआधीच भाजप-शिंदे सेना बहुमताच्या जवळ? अन् ठाकरेंना धक्का
पूजा मोरेंच्या वादात आता मराठा अँगल, उमेदवारी मागे अन् ट्रोलिंग चर्चेत
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना

