Devendra Fadnavis Video : राज्यातील गुन्हेगारीवर बोलताना फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले, महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक?
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सादर केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्याचा देखील क्रमांक सांगितला.
देशात जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होतात त्यासर्व महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा आठवा लागतो. तर शहरांमध्ये नागपूरचा सातवा क्रमांक असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी सादर केली. तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश देशातील ही प्रमुख राज्य आपल्या पुढे असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जर शहरांचा विचार करायचा झाला तर पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहा शहरांमध्ये सातव्या क्रमांकावर नागपूर हे शहर असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी सभागृहात दिली. नागपूर हे यासाठी दिसतं की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर पहिल्या दहामध्ये आपलं कोणतंही शहर नाही, मुंबई सारखं शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे, पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमाकांवर इंदोर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमकांवर पटणा आहे. गाझियाबाद आहे. पुढे त्यांनी असेही म्हटलेकी, देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत.

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
