SSC Result 2025 : पोरांनो ऑल द बेस्ट… उद्या लागणार 10 वीचा निकाल, TV9 मराठीसह ‘या’ लिंकवर बघा रिझल्ट
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षाचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहता येणार आहे.
यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून यासाठी नोंदणी करण्यात आली होती. उद्या 13 मे रोजी निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपले गुण ऑनलाईन पद्धतीने जाणून घेता येणार आहे.
या लिंकवर बघा आपला निकाल?
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://www.tv9hindi.com/education/board-exams/mahara exams
https://mahresult.nic.in
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

