Maharashtra Weather Update : राज्यात आज मुसळधार… ‘या’ भागाला पाऊस झोडपणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोणत्या भागात आज मुसळधार पाऊस होणार?
मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरींनी काहिसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केल्याने बळीराजा चिंतेत आहे. मे महिना असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होत आहे तर काही ठिकाणी दिवसा ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. अशातच राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याही अंदाज आहे. राज्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.