हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर

हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर

| Updated on: Jun 22, 2026 | 4:45 PM

‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू; या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक चर्चेत.

‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू; या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक चर्चेत.

राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. यामध्ये अशोक खरात यांच्यावर आधारित कथा असेल असं सांगितलं जात आहे; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिपाली सय्यद यांचा या भूमिकेतील फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशी वेशभूषा, देहबोली आणि लूक पाहून अनेकांनी त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. अशोक खरात यांच्या भूमिकेत कोण असेल हे अजून गुपित ठेवण्यात आले आहे.

Published on: Jun 22, 2026 4:45 PM
Follow Us