Ahmedabad Plane Crashe : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू, पनवेलच्या न्हावावर शोककळा
Maithili Patil Dead In Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत पनवेलमधील मैथिली पाटील या 23 वर्षांच्या हवाई सुंदरीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी याच विमानातून तिने आपल्या आईसोबत शेवटचा संपर्क साधला होता. मैथिली एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती. मैथिलीच्या मृत्यूने पनवेलमधील न्हावा गावात शोककळा पसरली आहे.
अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं फ्लाइट एआय 171 कोसळलं. या विमान दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यात पनवेलच्या न्हावा गावातली मैथिली पाटील देखील होती. मैथिली या विमानात एयर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती. 23 वर्षांच्या मैथालीच्या पश्चात आई – वडील , बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरी सुरु केली होती. आजच्या घटनेनं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
