Manikrao Kokate : त्यांनी वक्तव्य करण्यापूर्वी..; भुजबळांच्या मंत्रिपदावर कोकाटेंचं मोठं विधान
Manikrao Kokate on Bhujbal : छगन भुजबळ यांचं महायुतीच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे. त्यावर आज मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘जहा नही चैना, वहा नही रहना’ हे भुजबळांचे उतावीळ पणाचे वक्तव्य होतं. भुजबळ आमच्यापेक्षा देखील सिनियर आहेत. भुजबळांनी वक्तव्य करण्यापूर्वी वाट बघायला हवी होती, असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे. बऱ्याच दिवसांच्या नाराजी नाट्यानंतर आज अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुढे बोलताना कोकाटे म्हणाले की, भुजबळ यांचं स्वागत आहे. आता त्यांना न्याय मिळाला आहे. आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल. अजितदादांनी सर्व समावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे. ओबीसी चेहरा असावा असं त्यांना आधीपासून वाटत होतं. बाकी चुरस वगैरे मी मानत नाही. कशावरच दावा करत नाही, पक्ष महत्वाचा आहे. एकाच पक्षात राहून गटबाजी करत राहिलो तर काही उपयोग होणार नाही, भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. अजितदादा न्याय देतात. काही वेळेस वाट बघावी लागते. लगेच एखाद्या गोष्टीवर भाष्य करणं चुकीचं असतं, असंही यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले.