Manoj Jarange Patil | पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच… मनोज जरांगे यांचा थेट इशारा
मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी 30 तारखेपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत हे उपोषण आतापर्यंत देशात झालेल्या आंदोलनांपेक्षा अधिक कठोर असेल, असा दावा केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “या वेळचं उपोषण रणरणत्या उन्हात होणार आहे. मी मंडपाखाली किंवा सावलीत बसणार नाही. थेट उन्हात बसून आंदोलन करणार आहे. मला उष्माघात झाला किंवा काही अनुचित घडलं तर त्याला राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. मात्र त्यानंतर सरकारकडून कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्याने जरांगे पाटील संतप्त झाल्याचं दिसून आलं.
“सरकारला अनेकदा मुदत दिली, पण काहीच निर्णय झाला नाही. आता मंत्री अंतरवालीत येऊन काय करणार?” असा सवाल करत त्यांनी समाजबांधवांना आंदोलनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहनही केलं. 30 तारखेपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 28, 2026 11:29 AM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..