भर स्टेजवर जरांगे यांना आली भोवळ, उपचारासाठी डॉक्टरांकडे रवानगी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच रहाणार असेही पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. शनिवारी सातारा येथे एका सभेला संबोधित असतानाच त्यांना चक्कर आल्याने ते स्टेजवर खाली बसले. त्यांना तातडीने पाण्याची बाटली देण्यात आली. जरांगे गेले अनेक दिवस उपोषण करीत आहेत त्यांच्या डॉक्टरांचे उपचार देखील सुरु होते. त्यांना नीट औषधे घेऊन योग्य वेळेत आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतू त्यांना अशक्तपणामुळे चक्कर आली असल्याचे म्हटले जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही अशा आशयाचे वक्तव्यं केले होते.नंतर राज ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे असे मराठवाडा दौऱ्यांत स्पष्ट केले. त्याआधी राज ठाकरे यांच्या कारवर बीड येथे तरुणांनी सुपाऱ्या टाकून निषेध केला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्या आड शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण करीत आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील राज ठाकरे यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सातारा येथे जरांगे यांना भोवळ आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.