मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते यांनी सुरू केलेले उपोषण १२ व्या दिवशीही सुरू आहे. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या चर्चेत दातेंनी मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग व त्याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण, माधुरी पाटील खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन, तसेच गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे व इतर 242 मराठा […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते यांनी सुरू केलेले उपोषण १२ व्या दिवशीही सुरू आहे. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या चर्चेत दातेंनी मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या.
या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग व त्याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण, माधुरी पाटील खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन, तसेच गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे व इतर 242 मराठा शहीदांच्या स्मरणार्थ एक एकर जागा आणि 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी प्रमुख होती.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणेच राजकीय आरक्षण वगळून शैक्षणिक आणि सामाजिक सवलती मिळाव्यात, अशी मागणी दातेंनी केली. यामुळे समाजाची प्रगती होईल आणि कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही. प्रलंबित नियुक्त्या तात्काळ देण्याचीही मागणी त्यांनी केली. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार दातेंनी व्यक्त केला. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असून, लवकरच लेखी आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.
