Breaking News : हिंदीच्या मुदद्यावरुन आझाद मैदानावर आंदोलन
Marathi Abhyas Kendra Protests : मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. हिंदीच्या मुद्यासंदर्भातील जीआर रद्द झाल्यानंतर देखील आज हे आंदोलन होत आहे. डॉ. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या त्रिभाषिक धोरणाविरोधातील निदर्शने राज्यभर तीव्र झाली आहेत. 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर “शालेय शिक्षण अभ्यास समिती”च्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन होणार आहे. पवार यांनी प्राध्यापक नरेंद्र जाधव यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, प्रा. जाधव हे बालशिक्षणाचे तज्ज्ञ नसतील, तर त्यांना शालेय शिक्षणाच्या भाषा धोरणासारख्या संवेदनशील विषयाची जबाबदारी का सोपवण्यात आली? या आंदोलनातून सरकारला त्रिभाषिक धोरण पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

