एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना… FDA ची धडक कारवाई

एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना… FDA ची धडक कारवाई

| Updated on: Jul 12, 2026 | 1:45 PM

भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएच्या कारवाईनंतर तपासाचा विस्तार करण्यात आला असून या प्रकरणाचे धागेदोरे अनेक भागांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले जात आहे.

धाराशिवमधील भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएच्या कारवाईनंतर तपासाचा विस्तार करण्यात आला असून या प्रकरणाचे धागेदोरे अनेक भागांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले जात आहे.

तपासादरम्यान भूम परिसरातील तब्बल 200 दूध संकलन केंद्रांना मोठ्या प्रमाणात दूध पावडर विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील 6 महिन्यांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांची दूध पावडर विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दूध संकलन केंद्रांमधून जमा होणाऱ्या दुधामध्ये भेसळ करण्यात आली का, याचा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. संबंधित व्यवहारांची कागदपत्रे, खरेदी-विक्री नोंदी आणि पुरवठा साखळीची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून पडताळली जात आहे. या प्रकरणामुळे दूध उत्पादक, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Published on: Jul 12, 2026 1:45 PM
Follow Us