Minister Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडलं वाशिमचं पालकमंत्रिपद, काय आहे कारण?
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडल्याने चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडली आहे. वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आलेली होती मात्र आता त्यांनी हे पद सोडलं आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरशी संबंधित आहेत. वाशिमचं पालकमंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी याबद्दल वक्तव्य देखील केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडली आहे. एकीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पद सोडल्याने चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा केली आहे. तसंच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी नाही आहे, त्यामुळे वाशिमचं पालकमंत्रिपद आता दत्ता भरणे यांच्याकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

