अधिवेशानात केलेल्या आंदोलनावरून रोहित पवार यांच्यावर भाजप मंत्र्याला टोला; म्हणाला, ‘पॉलिटिकल स्कोरिंग’
एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेतले होते.
नाशिक, 29 जुलै 2023 | गेल्या पाच दिवसांपुर्वी कर्जत- जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांना एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेतले होते. यावरून आता भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केलीय. विखे पाटील यांनी एमआयडीसी मिळणे बाबत ते किती गंभीर आहे, हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही असा टोला लगावताना रोहित पवार यांचे पॉलिटिकल स्कोरिंग सुरू आहे असल्याची टीका केली आहे. तर याच एमआयडीसीसाठी माजी मंत्री राम शिंदे हे देखील आग्रही असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. तर राम शिंदे यांची मागणी असल्यानेच सरकार यावर निश्चितच प्रयत्न करेल असेही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

