AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?; रोहित पवार असं का म्हणाले?

प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होणार असं विधान केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?; रोहित पवार असं का म्हणाले?
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 28, 2023 | 6:59 AM
Share

मुंबई | 28 जुलै 2023 : अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, असं विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल केलं. त्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत करत आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. त्यातच आता अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठं विधान केलं आहे. रोहित पवार यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. परंतु, सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्री असते. परंतु सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

त्यावर भाष्य नको

प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होणार असं विधान केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. कोणी काहीही म्हणो मी त्यावर भाष्य करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

10-15 वर्षानंतर अजितदादा मुख्यमंत्री

प्रफुल्ल पटेल काहीही बोलले असले तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील. प्रफुल्ल पटेल असे म्हणाले की, भविष्यामध्ये अजितदादा हे मुख्यमंत्री होतील. भविष्यात म्हटल्यावर 2024 पर्यंत मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार हे स्पष्ट आहे. 2024 च्या नंतरही पुढील दहा वर्षानंतर, पंधरा वर्षानंतर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?