उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात ‘तू तू मैं मे’

विधान परिषदेत आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन आमदार अनिल परब आणि सभापती नीलम गोऱ्हे यांच्यात चांगलंच तू तू मैं मे बघायला मिळालं. भाजप आमदारांनी अनिल परब यांच्या विनंतीला विरोध केल्याने हा सगळा प्रकार घडला.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात 'तू तू मैं मे'
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 7:06 PM

मुंबई | 27 जुलै 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. उद्धव ठाकरे यांना राज्यासह देशपातळीवरील नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. असं असताना आज विधान परिषदेत सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन चांगलंच तू तू मैं मे बघायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

विधान परिषदेचं कामकाज सुरु होतं. सध्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान विधान परिषदेत आज चर्चा सुरु होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने आम्हाला लवकर जायचे आहे. याबाबत आम्ही विनंती केली होती”, असं सभापतींना सांगितलं. पण त्यांच्या या मुद्द्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला. “असं कसं चालेल? तुम्हाला जायचे असेल तर जावा”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

‘…तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका’, परब यांचा इशारा

प्रवीण दरेकर यांच्या भूमिकेवर अनिल परब यांनी महत्त्वाचा इशारा दिला. “सत्ताधारी पक्षाची अशी जर भूमिका असेल तर मग आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करु नका”, असा इशारा अनिल परब यांनी दिला. या दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही आमदार खाली बसूनच बोलले की, “नको आम्हाला तुमचे सहकार्य.” यावर अनिल परब यांनी वक्तव्य केलं.

“मग आम्हाला बिलांवर बोलायचे आहे आणि जर मंजूर झाले नाही तर जबाबदारी आमची नाही”, असं उत्तर अनिल परब यांनी सत्ताधारी आमदारांना दिलं. त्यावर सभापती निलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली.

‘उशिरा गेलात तरी चालेला ना?’, सभापतींचा प्रश्न

“मंत्री अतुल सावे यांचे बिल महत्वाचे आहे. त्यामुळे हे बिल अहंकाराचं आणि प्रतिष्ठेचा प्रश्न कुणी करु नये. ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे. उशिरा गेलात तरी चालेला ना? आम्हालाही माहितीये काही असा प्रश्न नाहीय. त्याच्यावर जाहीर चर्चा करु नका”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर अनिल परब यांनी “आमची विनंती मान्य करता येणार नाही असं स्पष्ट करा मग”, असं म्हटलं.

‘सभागृहात कशाला आलात ते विसरु नका’, सभापतींनी खडसावलं

“अनिल परब जेवलात ना? वाढदिवसाच्या दिवशी असं वागणं बरं दिसतं का? वाढदिवसाकरता जाणे गरजेचे आहे. पण ज्याकरता तुम्ही या सभागृहात आलात तेही तुम्ही विसरु नका”, अशा शब्दांत सभापती नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना सुनावलं. “36 नंबरचे विधेयक होते ते आता इथे 36 चा आकडा होता होता राहिले. मी रागावले नाही. मला तसं वाटलं”, असंही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.