Vaishnavi Hagawane Case : हा नीचपणा अन् निर्घृणतेचा कळस… वैष्णवी हगवणे प्रकरणावरून उदय सामंतांचा संताप
पुढच्या काही 24 तासांत वैष्णवी प्रकरणातील फरार लोकांना तुरुंगात टाकण्यात पोलीस यशस्वी होतील. त्यांनी जो नीचपणा केला आहे, तो पहता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हा नीचपणाचा तसेच क्रुरतेचा कळस आहे. या प्रकरणात ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल असे आश्वासन उदय सामंत यांनी कसपटे कुटुंबाला दिलं. पुढे ते असेही म्हणाले, हा निर्घृणतेचा कळस आहे. हा अमानुषपणा आहे. मी राजकीय पुढारी आहे, मी नेता आहे, मी कुठल्यातरी पक्षात काम करतोय म्हणून मला अशी कुकृत्ये करण्याची मुभा आहे, असं चित्र भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे.