एकनाथ शिंदेंचा राजन साळवींना फोन, ‘या’ तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश? शिवसेनेच्या बड्या मंत्र्यानं थेट सांगितलं…
राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच राजन साळवी यांना एकनाथ शिंदेंचा फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच राजन साळवी यांना एकनाथ शिंदेंचा फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. या फोनमध्ये १० तारखेऐवजी १३ तारखेला शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात बोलणं झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच चर्चा सुरू असताना राजन साळवी यांनी प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला होता. “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर असल्याच्या या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले होते.
राजन साळवी यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर शिवसेना नेता आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, ‘एकनाथ शिंदे आणि राजन साळवी यांची पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाली की नाही याबाबत माहिती नाही. फक्त एकदाच माझी एकनाथ शिंदेंसोबत यावर चर्चा झाली होती. मागच्या वेळी राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारावं म्हणून कित्येकदा मी विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी नकार दिला. पण त्यांच्या मतदारसंघात साळवींविरोधात माझे बंधू निवडणुकीला उभे होते तेव्हा १८ हजार मतांनी त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे आता लांजा, राजापूर आणि साखरपा हा पूर्ण एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. उबाठाचे ९९ टक्के पदाधिकारी शिवसेनेत काम करतायत. पण साळवींचा १८ हजार मतांनी ज्यांनी पराभव केलाय. त्यांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया शिंदे राबवतील’, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
