‘त्यांनी गप्पा हाणाव्यात का?’ राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर अजित दादांचं थेट प्रत्युत्तर
विधानसभा निकालावर शंका वर्तवत राज ठाकरे यांनी अजित पवार यांवर टीका केली होती आणि तो वाद आता एकमेकांच्या मुलांच्या निवडणुकीपर्यंत गेला आहे. अरे मुलांना जिंकून आणता आले नाही, काय गप्पा मारता! अजित पवारांचा पलटवार
अजित पवारांना 43 जागा कशा काय मिळाल्या? या राज ठाकरे यांच्या सवालावरून हा वाद आता राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या मुलांच्या निवडणुकीपर्यंत गेला आहे. ज्या अजित पवारांच्या विधानसभेला चार किंवा पाच जागा तरी येतील का अशी शंका होती त्यांना 43 जागा कशा आल्या? यावरून राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावरच अनेक प्रश्न केले होते. मात्र भाजपला मिळालेले 132 जागांबद्दल शंका न वर्तवता त्यांनी शिंदेंना मिळालेल्या 56 आणि अजित पवारांना मिळालेले 43 जागांवरून दोघांवर टीका केली होती. त्यावरून ज्यांना आपल्या मुलाला निवडून आणता येत नाही त्यांनी गप्पा हाणाव्यात का? अस उत्तर अजित पवारांनी दिलं. विधानसभेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघात पराभूत झाले. सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर पराभूत होणारे अमित ठाकरे पहिले नेते ठरले. त्यावरच अजित पवारांनी बोट ठेवलं त्यामुळे मनसेकडूनही अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाल्याची आठवण करून देण्यात आली. ‘मी खूप लहान आहे अजित पवारांना प्रतिक्रिया देण्यासाठी.. मला वाटते राज साहेबच त्यांना उत्तर देतील. पण मी एवढे सांगेन की निवडणुकीत हरलो असलो तरी खचलो नाहीये. खूप शिकलोय. या निवडणुकीत त्याच्यामुळे या गोष्टींचा मला फरक पडत नाही. पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे’, असं अमित ठाकरे म्हणाले. बघा स्पेशल रिपोर्ट…