खासदारांचे हे हाल तर आमदारांचे… शिंदे गटाच्या खासदार-आमदारांना कुणाचा खोचक टोला?
.हेमंत पाटील यांनी केलेल्या शक्तिप्रदर्नावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. शिंदे गटाचे खासदार आता शक्तिप्रदर्शन करताय, वैभव नाईक यांनी असं वक्तव्य करत असताना शिंदे गटाच्या खासदार आणि आमदारांना खोचक टोला लगावला आहे. काय म्हणाले बघा व्हिडीओ....
उद्धव ठाकरे असताना खासदारांना गाड्या घेऊन यावं लागत नव्हतं…हेमंत पाटील यांनी केलेल्या शक्तिप्रदर्नावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. शिंदे गटाचे खासदार आता शक्तिप्रदर्शन करताय, वैभव नाईक यांनी असं वक्तव्य करत असताना शिंदे गटाच्या खासदार आणि आमदारांना खोचक टोला लगावला आहे. जागावाटपावरून टोला लगावताना वैभव नाईक म्हणाले, ‘उद्धव ठाकरे असताना केणत्याही खासदाराला १००, २०० गाड्या कार्यकर्ते घेऊन तिकीट मागण्यासाठी यावं लागलं नव्हतं. ऐवढी हिंमतही कुणीच केली नव्हती, पण आता खासदार शक्ती प्रदर्शन करत आहेत तरी त्यांना तिकीट मिळत नाहीये. त्यामुळे खासदारांचे हे हाल आहेत तर आमदारांचे काय होणार?’, असा खोचक सवालही वैभव नाईक यांनी केलाय तर आत्तापासूनच आमदारांनी भाजपच्या विरोधात काम करून जोडणी करून घ्यावी असा सल्लाही वैभव नाईक यांनी दिलाय.
Latest Videos
Latest News