MNS Meeting : जर सकारात्मक बोलणं सुरू असेल तर..; पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे मोठी मागणी
Thackeray brothers reunion : ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेवर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत राज ठाकरेंच्या समोर मोठी मागणी केली आहे.
ठाकरे ब्रॅंड टिकला पाहिजे अशी ईच्छा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही ईच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 पक्षांमध्ये सकारात्मक बोलण असेल तर चांगली गोष्ट आहे, असं देखील पदाधिकाऱ्यांचं म्हणण आहे, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंच्या समोर झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही ईच्छा व्यक्त केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यापासून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मनसे आणि शिवसेना उबाठा गटातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून या चर्चेचं स्वागत केलं आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढाव अशी भूमिका कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी 2 पक्षांमध्ये सकारात्मक बोलण असेल तर चांगली गोष्ट आहे, ठाकरे ब्रॅंड टिकला पाहिजे अशी ईच्छा व्यक्त केल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

