लोकांचा रोष थंड करण्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करुन नंतर पुन्हा कामावर घ्यायचं, हे म्हणजे थंड करुन मलिदा खाणे : राजू पाटील

| Updated on: Oct 21, 2021 | 11:06 PM

लोकांचा रोष असेल तर कोणालाही निलंबीत करायचे आणि नंतर कामावर घ्यायचे हीच यांची कामे आहेत. याला म्हणतात लोकांचा रोष थंड करुन मलिदा खाणे. हेच यांचे काम आहे, अशी खोचक टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

लोकांचा रोष थंड करण्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करुन नंतर पुन्हा कामावर घ्यायचं, हे म्हणजे थंड करुन मलिदा खाणे : राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील
Follow us on

ठाणे : लोकांचा रोष असेल तर कोणालाही निलंबीत करायचे आणि नंतर कामावर घ्यायचे हीच यांची कामे आहेत. याला म्हणतात लोकांचा रोष थंड करुन मलिदा खाणे. हेच यांचे काम आहे, अशी खोचक टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. ठाणे महापालिकेच्या निलंबित चार अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतल्याने राजू पाटलांनी ही टिका केली. इतकेच नाही तर जे अधिकारी दोषी नव्हते त्यांच्या विरोधात कारवाई केली गेली होती, असाही आरोप मनसे आमदार पाटील यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील नेतिवली आणि श्रीकृष्ण नगर येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी दीपक यादव, महेंद्र कुंदे, तौफिक हुल्ले, मोहन गुप्ता हे उपस्थित होते. यावेळी मनसे आमदारांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. ठाणे महापालिकेतील निलंबित चार कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं आहे. याचं मुद्द्यावर भाष्य करताना राजू पाटलांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

“रस्त्याच्या पाहणीनंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. खरे बघायले गेले तर हे रस्ते एमएसआरडीसी आणि पीडब्लू विभागांतर्गत येतात. त्यांच्यावर कारवाई न करता ज्यांचा काही दोष नव्हता त्यांच्या विरोधात कारवाई झाली. तसेच निलंबितांना तर पुन्हा कामावर घ्यावे लागेल. हा म्हणजे लोकांचा रोष थंड करुन मलिदा खायचा हा प्रकार आहे”, असा घणाघात राजू पाटलांनी केला आहे.

इतकेच नाही आधी बीओटी तत्वावर प्रकल्प विकसित करण्यासाठी दिले. ते धूळ खात पडले याहे. आधी बीओटी तत्वावर भ्रष्टाचार केला. आता पीपीपी तत्वावर म्हणजे खायचे धंदे सुरु आहेत, अशीदेखील टीका पाटील यांनी केली.

“कल्याण पश्चिमेतील वायलेनगर मधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला केंद्र आहे. याठिकाणी आता पोलीस उपायुक्त, प्रांत आणि निवडणूक कार्यालय आहे. बाळासाहेबांच्या नावाची साधी पाटी सुद्धा नाही. ज्यांनी आवाज उचलला त्या नगरसेवकाच्या विरोधात केस झाली”, असं राजू पाटील म्हणाले.

‘भारत-पाकिस्तान सामने खेळवले जाऊ नये’

एकीकडे देशाचे सैनिक धारातीर्थी पडत आहेत आणि दुसरीकडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळला जातोय. पाकिस्तानसोबत सामना खेळणे योग्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच अशा प्रकाराला विरोध केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आहेत. त्याचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे? असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदुस्तानी नागरीकाला वाटेल की भारत-पाकिस्तान समाना खेळवला जाऊ नये. मनसे आमदार कल्याणमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाला आले होते तेव्हा पत्रकरांनी प्रश्न विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.

हेही वाचा :

VIDEO : काय चाललंय ठाण्यात? आता अंबरनाथमध्ये चोरट्यांनी चौकात उभ्या असलेल्या तरुणाच्या हातून मोबाईल हिसकावला

VIDEO | बॅनर लावण्यावरुन वाद, नालासोपाऱ्यात तीन मनसे कार्यकर्त्यांना जमावाची मारहाण