VIDEO | बॅनर लावण्यावरुन वाद, नालासोपाऱ्यात तीन मनसे कार्यकर्त्यांना जमावाची मारहाण

कल्पेश पवार, किरण कुमठेकर, जाधव असे मारहाण झालेल्या मनसे कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर नालासोपारा पूर्वेच्या लाईफ केअर या रुग्णालयात उपचार सुरु असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

VIDEO | बॅनर लावण्यावरुन वाद, नालासोपाऱ्यात तीन मनसे कार्यकर्त्यांना जमावाची मारहाण
नालासोपाऱ्यात दोन गटात हाणामारी


नालासोपारा : नालासोपाऱ्यात बॅनर लावण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली असल्याचा प्रकार उघड झाला आहे. सोसायटीतील जमावाकडून ही मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेत आचोळे पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

नालासोपारा पूर्व भागात रेल्वे ट्रॅकजवळील यशवंत विवा मॉल टाऊनशीपच्या जवळ मुख्य रस्त्यावर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारासची ही घटना घडली आहे. हातात लाठी-काठी घेऊन जमावाने मनसे कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या मारहाणीत मनसे कार्यकर्ते जखमीही झाले आहेत.

कल्पेश पवार, किरण कुमठेकर, जाधव असे मारहाण झालेल्या मनसे कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर नालासोपारा पूर्वेच्या लाईफ केअर या रुग्णालयात उपचार सुरु असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

सौरभ पांडे (वय 22) अनिल सिंग (वय 45) असे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं असून त्यांना अटक झाली आहे. यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास अचोळे पोलीस करत आहेत. मात्र परप्रांतीय विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ :

दुसरीकडे, येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दहशत माजवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे मोठे प्रकार वारंवार घडत असतात.

हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड

या घटनेमुळे पुन्हा एकदा येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जणांनी येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामानाची तोडफोड केली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप समजू शकले नाही.

येरवडा परिसरात वाढती गुन्हेगारी

यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे आणि अशा युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दहशत माजवणाऱ्यांच्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | चार अल्पवयीन मुलांचा येरवड्यात हैदोस, हॉकी स्टिकने दुकानांतील सामानाची तोडफोड

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI