MNS : मनसैनिकांनी केडियाचं ऑफिस फोडलं अन् नरमला, मराठीचा अपमान महागात; आता म्हणतो चूक झाली …
मुंबईत राहून भाषेचा सन्मान केडियासारखे व्यवसायिक करत नसून उलट ट्विटद्वारे आपण तीस वर्ष राहून सुद्धा मराठी येत नाही काय करायचे बोल असा माज दाखवताय. अशातच मनसेने चांगलाच दणका दिलाय.
मनसेच्या दणक्यानंतर मुंबईतील व्यावसायिक सुनील केडिया हा चांगलाच नरमल्याचे पाहायला मिळत आहे. माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो असं म्हणत सुशील केडियाने जाहीरपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मनसैनिकांच्या कार्यकर्त्यांकडून सुशील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली. मराठी-हिंदीचा भाषा वाद राज्यात सुरू असताना सुशील केडियाने मराठी न बोलण्याची मुजोरीची भाषा केली होती. इतकंच नाहीत राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सुशील केडियाने त्यांनाच चॅलेंज दिलं होतं. या प्रकरणावरून मनसेने आपल्या स्टाईलने सुशील केडियाला दणका दिला त्यानंतर सुशील केडियाने केलेल्या उद्दामपणावर आपला माफीनामा दिलाय.
‘नोंद घ्या राज ठाकरे मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पाहता मी पण प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला…’, असं केडियाने म्हटलं होतं.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
