मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला…

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला…

| Updated on: Nov 09, 2026 | 5:16 PM

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. दिवाळीतील फटाक्यांमुळे प्रदूषण वाढल्याचे चित्र आहे. वांद्र्यातील खेरवाडी येथे हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 264 वर पोहोचला असून, बीकेसी, देवनार, चेंबूर यांसारख्या ठिकाणीही AQI 200 च्या वर आहे. डॉक्टरांनी नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून, अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः दिवाळीनंतर फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये AQI 171 वर नोंदवला गेला, जो मध्यम श्रेणीत येतो. मात्र, शहरातील इतर अनेक भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. वांद्र्यातील खेरवाडी येथे AQI 264 वर पोहोचला आहे, जो खराब श्रेणीत येतो. बीकेसीमध्ये 231, देवनारमध्ये 226, चेंबूरमध्ये 216 आणि नेव्हीनगर कुलाबा येथे 213 असा AQI नोंदवला गेला आहे.

घाटकोपरमध्ये 221, तर मालाडमध्ये 191 आणि वरळीमध्ये 148 AQI आढळला आहे. हवा गुणवत्ता मानकांनुसार, 201 ते 300 मधील AQI खराब मानला जातो, तर 301 ते 400 अतिशय खराब आणि 401 ते 500 गंभीर असतो. सध्या मुंबईतील अनेक भागांमध्ये AQI खराब श्रेणीत असल्यामुळे, डॉक्टरांनी मुंबईकरांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Published on: Nov 09, 2026 5:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us