Mumbai Rain Updates : सीएसएमटी स्थानकाबाहेरचं जुनं झाड कोसळलं
Mumbai Mansoon Rain Disaster : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली आहे.
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एकीकडे वरळीत भुयारी मेट्रो स्थानकाजवळ नुकसान झालेलं असतानाच दुसरीकडे सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर देखील एक दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एक झाड कोसळलं आहे.
मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई आज झालेली बघायला मिळाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर च्या भागात असलेलं एक मोठं झाड या पावसामुळे कोसळलं आहे. एका चारचाकी गाडीवर हे झाड कोसळलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड हे प्रशासनाच्या गाडीवर कोसळलं. या घटनेत गाडीच्या काचा फुटल्या आहेत. सध्या पडलेलं झाड बाजूला करण्याचं काम सुरु आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

