Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Police : नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

Nagpur Police : नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

| Updated on: Mar 19, 2025 | 5:29 PM

Vishwa Hindu Parishad Nagpur : नागपूर हिंसचारापूर्वी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे 8 कार्यकर्ते स्वत:हून कोतवाल पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आठ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर या कार्यकर्त्यांकडून जामीनासाठी प्रयत्न सुरू आहे.

हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेचे हे कार्यकर्ते स्वत:हून कोतवाले पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याबरोबर याठिकाणी मोठ्या संख्येने इतर हिंदुत्ववादी संघटना आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. सोमवारी झालेल्या हिंसचारापूर्वी याच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.

Published on: Mar 19, 2025 05:29 PM